Wed, Jul 17, 2019 20:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दाऊद का यायचे म्हणतोय?

भारतात परतण्यासाठी दाऊद आसुसला का?

Published On: Mar 08 2018 1:48AM | Last Updated: Mar 08 2018 1:48AMठाणे : नरेंद्र राठोड 

गेली तीन दशके स्वतःला अंडरवर्ल्ड डॉन म्हणून मिरवणारा दाऊद इब्राहिम आता पुन्हा भारतात परतण्यासाठी प्रयत्न करतोय. अगदी हास्यास्पद वाटेल अशी अट त्याने घातली. आर्थर रोड जेलमध्ये ठेवणार असाल तर येतो, असे दाऊदच्या वतीने वकिलांनी सांगितले. ही अट किती खरी हे पुढे स्पष्ट होईलच. परंतु, भारतात परतण्यासाठी दाऊद अचानक का आसुसला या एका प्रश्‍नाची उत्तरे मात्र अनेक आहेत. 

दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अडकला असून तो ठाणे पोलिसांच्या ताब्यात आहे. इक्बालची चौकशी करत असलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने दाऊद खरंच भारतात परतण्यास इच्छुक असल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. भावाच्या वकिलामार्फत थेट न्यायव्यवस्थेसमोर भारतात परतण्याचं जाहीर करणं हा देखील त्याच्याच इच्छेचा भाग आहे, अन्यथा हा मुद्दा उपस्थितच झाला नसता असे मत तपास यंत्रणांसह पोलिसांनी व्यक्त केले आहे. दाऊद गेल्या अनेक वर्षांपासून भारतात परतण्यास इच्छुक असून त्याने स्वतःहून तसा प्रयत्न देखील केला आहे. मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या आभावामुळे ते शक्य होत नसल्याचे या अधिकार्‍याने सांगितले. दाऊद भारतात परतल्यास त्याच्या कबुली जाबाबातून अनेक गोप्यस्फोट होऊ शकतात म्हणून देखील काही राजकीय व्यक्तींनी त्याच्या परण्यास सुरूवातीपासूनच विरोध केला आहे. 

दाऊद भारतात परतण्यास इच्छुक का आहे, याबद्दल उच्चस्तरीय अधिकार्‍यांनी लावलेले अंदाज असे-

1 दाऊदची अलीकडे दिवसेंदिवस मोडकळीस येत असलेली गँग

2 मुलगा मोईन नवाज हा मौलवी बनल्याचे शल्य.

3 सततचे आजारपण आणि उपचार 

4 छोटा शकिलने दाऊद विरुद्ध पुकारलेले बंड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 

5 पाकिस्थान कधीही दगाबाजी करू शकतो याची पुरेपूर झालेली जाणीव 

6 दाऊदचा कट्टर दुश्मन छोटा राजन सध्या भारतीय तपास यंत्रणांच्या ताब्यात असून राजनच्या माहिती वरूनच तपास यंत्रणा दाऊद पर्यंत पोहचू शकतात. त्यामुळे देखील दाऊद स्वत:हून भारताच्या ताब्यात येण्याची मागणी करत असावा.

7 भारतात परतल्यास कुठलाही धोका न पत्करता तुरुंगात दिवस काढता येतील असा त्याचा मानस असावा. कदाचित म्हणूनच त्याच्या शूटरांचा गड असलेल्या आर्थर रोड तुरुंगातच मला ठेवण्यात यावे अशी अट दाऊदने पुढे 
केली असावी