Thu, Jul 18, 2019 04:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दाऊदच्या हस्तकाचे  नेत्यांशी संबंध

दाऊदच्या हस्तकाचे  नेत्यांशी संबंध

Published On: May 01 2018 1:39AM | Last Updated: May 01 2018 1:31AMठाणे : नरेंद्र राठोड 

आर्थिक व्यवहाराच्या वादातून मुंब्रा येथील केबल व्यावसाईक इब्राहिम मोहम्मद याची गोळ्या घालून हत्या करणार्‍या तारिक परवीन यास ठाणे खंडणी विरोधी पथकाने मुंबईतून अटक केल्यानंतर त्याला 1 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, तारिकच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होत असून त्याचे मुंब्रासह राज्यातील व उत्तर प्रदेशातील अनेक बड्या नेत्यांची चांगले संबंध असल्याचे उघड झाले आहे. आता पोलीस तारिकला कोणत्या नेत्यांनी गुन्ह्यानंतर मदत केलेली आहे का याचा शोध घेत आहेत. 

सुरूवातीला छोटे मोठे गुन्हे करणार्‍या तारिक याच्या भावाची 1994 साली जुबेर याची हत्या छोटा शकीलच्या सांगण्यावरून करण्यात आलेली होती. या हत्येनंतर तारिक घाबरून छोटा शकीलला शरण गेला व तेथूनच त्याची जवळीक शकील सोबत वाढली. त्यानंतर तो हवाला रॅकेटचे काम सांभाळू लागला. तर छोटा शकील विदेशात पळून गेल्यानंतर तो दाऊदचा केबल व्यवसायात देखील लक्ष घालू लावला.

1998 साली मुंब्रा येथे केबल व्यवसायातून दुहेरी हत्या घडवल्यानंतर देखील तारिक यास अटक झाली नाही. तर तो सर्रास मुंब्रात येजा करीत असे. मध्यंतरी उत्तरप्रदेश एटीएसने तारिकला अटक केलेली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पण तो तेथून देखील सहीसलामत सुटला. 

तारिक याने मुंबईतील एलटी रोडवरील अशोका शॉपिंग सेंटर मध्ये आपले ऑफिस देखील थाटले असून तो गेल्या अनेक वर्षांपासून येथे नियमित जाऊन बसत होता. येथूनच तो आपले सगळे दोन नंबरचे धंदे हाताळत होता. दरम्यान, तारिक याचे राज्यातील व उत्तर प्रदेशातील अनेक बड्या नेत्यांशी अत्यंत जवळीक असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. तारिकच्या काळ्या धंद्यात व त्याने केलेल्या गुन्ह्या त कोणकोणत्या नेत्यांनी त्यास मदत केलीय याचा तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Tags :Mumbai, mumbai news, Dawood Handler, Relationship, leader,