Mon, Apr 22, 2019 21:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देहव्यापारासाठी मुलीने आईला २ हजारांत विकले

देहव्यापारासाठी मुलीने आईला २ हजारांत विकले

Published On: Dec 01 2017 8:55AM | Last Updated: Dec 01 2017 8:54AM

बुकमार्क करा

डोंबिवली : वार्ताहर

पोटच्या मुलीला आईने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पडल्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. मात्र, वेश्याव्यवसाय करणार्‍या डोंबिवलीतील एका 23 वर्षीय दलाल तरुणीने चक्‍क आपल्या 46 वर्षीय आईचाच देहविक्रीसाठी दोन हजार रुपयांत सौदा केल्याची धक्‍कादायक घटना उघडकीस आली आहे. हेमा करोतिया (वय 23) असे दलाल तरुणीचे नाव असून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक ठाणे विभागाच्या पथकाने बनावट ग्राहक बनून डोंबिवली रेल्वे स्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये सापळा लावून तिला बेड्या ठोकल्या. तर या मायाजालात अडकलेल्या तिच्या आईसह दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे डोंबिवली पश्‍चिम रेल्वे स्थानकानजीक एका हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवून छापा टाकण्यात आला.

यावेळी पीडित आईसह एका तरुणीचीही पोलिसांनी सुटका केली. तर हेमाला अटक केली. आईनेच मला या व्यवसायात अडकवल्याचे सांगत आपण निर्दोष आहोत, असा कांगावा या तरुणीने पोलिसांसमोर केला.