Tue, Mar 26, 2019 23:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शासकीय वसाहतीतील इमारती ठरवल्या धोकादायक 

शासकीय वसाहतीतील इमारती ठरवल्या धोकादायक 

Published On: Dec 10 2017 1:20AM | Last Updated: Dec 10 2017 1:07AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतींचा पुनर्विकास करण्यासाठी आणि येथील कर्मचार्‍यांना हुसकावून लावण्यासाठी या इमारती धोकादायक ठरवण्यात आल्या आहेत, असा आरोप वसाहतीतील  रहिवाशांनी केला आहे. कोणतेही स्ट्रक्‍चरल ऑडिट न करता या इमारती धोकादायक कशा ठरवल्या? असा प्रश्‍नही या वसाहतींमधील कर्मचार्‍यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. 

वांद्रे (पूर्व) शासकीय कर्मचारी वसाहतीतील इमारतीत राहणार्‍या 400 रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने बजावल्या आहेत. यामुळे वांद्रे कॉलनीतील रहिवासी- कर्मचारी आणि अधिकारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या वसाहतीचा पुनर्विकास होणार असल्याने शासनाने इमारतींच्या दुरुस्ती कामांवर खर्च न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता कार्यालयाने या वसाहतीतील घरांचे बांधकाम धोकादायक झाले आहे. ही घरे रिकामी करा, अशा आशयाच्या नोटिसा बजावल्या आहेत. यामुळे रहिवाशांत खळबळ उडाली आहे. 1955 साली 96 एकर जमिनीवर या वसाहतींमध्ये 370 इमारती उभारण्यात आल्या. यामध्ये एकूण 4 हजार 400 घरे आहेत. यातील अनेक रहिवाशां घाटकोपर येथे पाठवण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी सुविधांची वानवा आहे.