Mon, Apr 22, 2019 05:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डहाणूतील विद्यार्थ्यांनी बनवली नॅनो मोटरसायकल

डहाणूतील विद्यार्थ्यांनी बनवली नॅनो मोटरसायकल

Published On: Apr 29 2018 2:08AM | Last Updated: Apr 29 2018 1:30AMबोर्डी : वार्ताहर 

डहाणूतील रुस्तमजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तब्बल शंभर फूट पिझ्झा बनवून आगळा वेगळा विक्रम केला होता. याच कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी चक्क नॅनो मोटरसायकल बनवली आहे. 80 सीसीचे इंजिन असलेली ही मोटारसायकल एक लिटर पेट्रोलमध्ये 70 किमी धावणार असून हाफ पायडलमध्ये स्टार्ट होते. टाटा कंपनीच्या नॅनो कारप्रमाणेच या नॅनो सायकलने सर्वांनाच भुरळ घातली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी डहाणू येथील रुस्तमजी महाविद्यालय नेहमीच विविध उपक्रम राबवते. काही महिन्यांपूर्वी 100 फूट लांबीचा पिझ्झा बनवून एक विक्रम करण्यात आला होता. इतकेच नाही तर सामाजिक बांधिलकी जपत हा पिझ्झा आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आला होता. अ‍ॅकॅडमीच्या ऑटोमोबाईल विभागातील विद्यार्थ्यांनी आता 80 सीसी इंजिन वापरून नॅनो मोटारसायकल बनवली आहे. 15 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर ही अनोखी सायकल आकाराला आली असून ती बनवण्यासाठी 22 हजार रुपये खर्च आला. नॅनो मोटारसायकलसह येथील विद्यार्थी इलेक्ट्रिक बग्गी कार, गो कार्टही बनवणार असून या प्रकल्पावर सध्या काम सुरू आहे. रुस्तमजीमधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सर्वत्रच कौतुक होत आहे.

Tags : Mumbai, mumbai news, Dahanu student, made, nano motorcycle,