Mon, Oct 21, 2019 04:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दादरच्या फूलविक्रेत्यांवर गंडांतर

दादरच्या फूलविक्रेत्यांवर गंडांतर

Published On: Jul 12 2018 1:42AM | Last Updated: Jul 12 2018 1:32AMमुंबई : प्रतिनिधी

दादर रेल्वे स्थानक परिसरात वर्षानुवर्षे फूलविक्रीचा  व्यवसाय करणार्‍या व्यापार्‍यांना स्थानकाच्या 150 मीटर परिसरात  फूलविक्री करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली. या परिसरात वर्षानुवर्षे सुरू असलेल्या फूलबाजाराला परवानगी द्यावी अशी बॉम्बे हॉकर्स असोसिएशनने केलेली विनंती न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली.

उच्च न्यायालयाने रेल्वे स्थानकाच्या 150 मीटर परिसरामध्ये फेरीवाल्यांना मनाई केल्याने दादर परिसरातील फूलविक्रेत्यांंच्या वतीने बॉम्बे हॉकर्स असोसिएशनने  उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. दादर स्थानकाजवळ  मंदिर तसेच धार्मिक स्थळे असून या ठिकाणी हजारो नागरिक दररोज येतात. त्यामुळे या परिसरात फूलविक्री करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी  न्यायालयाकडे केली. मात्र न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावली.पालिकेने निर्धारित क्षेत्राव्यतिरिक्त व्यवसाय करण्यास बंदी घातली असून मुंबईसह राज्यभरात फेरीवाला क्षेत्रातच आपला व्यवसाय करता येईल. दादर स्थानकापासून 150 मीटर परिसरात फूलविक्री करु नये असे आदेश दिले. WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DEeePAgbWU94pj0zgYWo19