Mon, Jul 15, 2019 23:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डीएसकेंच्या चिरंजीवाला तूर्त दिलासा; उद्या सुनावणी

डीएसकेंच्या चिरंजीवाला तूर्त दिलासा; उद्या सुनावणी

Published On: May 03 2018 1:42AM | Last Updated: May 03 2018 1:28AMमुंबई : प्रतिनिधी

ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यासाठी 50 कोटी रुपये न्यायालयात जमा करण्यास असमर्थ ठरल्यानंतर अटकपूर्व जामीन रद्द झाल्याने अटकेत असलेल्या पुण्याचे बांधकाम व्यवसायीक डी. एस. कुलकर्णी यांचा मुलगा आणि डीएसके डेव्हलपर्स लिमिटेडचा संचालक शिरीष कुलकर्णी याला उच्च न्यायालयाने तूर्त दिलासा दिला आहे. त्यांच्या अटकपूर्व जामिन अर्जाची सुनावणी 4 मे पर्यंत तहकूब ठेवताना अंतरीम अटकपूर्व जामीनाला मुदतवाढ दिली आहे. विषेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण आणि सरकारी वकील अ‍ॅड. श्रीकांत गवंडे यांनी मात्र याला जोरदार विरोध केला आहे.

पुणे शहरात घराला घरपण आणून देणार्‍या डी. एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी  यांच्याविरोधात ठेवदारांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डीएसके डेव्हलपर्स लिमिटेडचे संचालक असलेल्या शिरीष कुलकर्णी  याचा अटकपूर्व जामिन अर्ज पुणे जिल्हा न्यायालयाने फटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. न्या. ए. एम. बदर यांच्या निदर्शनास हा अर्ज आणून देण्यात आल्यानंतर 4 मे रोजी सुनावणी घेण्याचे निश्‍चित केले.

Tags : Mumbai, mumbai news, DSK, son Soon Console, Hearing tomorrow,