Tue, Apr 23, 2019 09:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डीएसकेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

डीएसकेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 17 2018 2:01AMमुंबई : प्रतिनिधी

ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यासाठी 50 कोटी रुपये न्यायालयात जमा करण्याची लेखी हमी देणार्‍या पुण्याचे बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी गुंतवणूकदारांचीच नव्हेतर न्यायालयाचीही दिशाभूल केली आहे, असे स्पष्ट करून उच्च न्यायालयाने कुलकर्णी यांना आतापर्यंत दिलेले संरक्षण काढून घेतले. पोलीस त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करू शकतात, असे स्पष्ट करताना न्यायमूर्ती साधना जाधव यांनी अटकपूर्व जामिनावर अंतिम सुनावणी 1 मार्चपर्यंत तहकूब ठेवली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे कुलकर्णी दापत्यांना  कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

बुलढाणा अर्बन बँकेकडून दिल्या जाणार्‍या कर्जाचा हवाला देऊन डीएसके यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी 50 कोटी रुपये जमा करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यात त्यांना वारंवार अपयश आल्यानंतर बुलढाणा अर्बन बँकेकडून दिल्या जाणार्‍या कर्जाचा अहवाल देऊन डीएसके यांनी न्यायालयाकडून 22 फेबु्रवारीपर्यंतची मुदत घेतली होती. मात्र बुलढाणा बँकेकडे सादर केलेली मालमत्तेची कागदपत्रे ही यापूर्वी अन्य बँकेकडे तारण ठेवणे ही न्यायालयाची दिशाभूल असल्याचा आरोप सरकारी वकील वीरा शिंदे यांनी केला. या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याची त्यांनी विनंती केल्यानंतर शुक्रवारी या अर्जावर न्यायमूर्ती साधना जाधव यांच्यासमोर तातडीने सुनावणी घेण्यात आली.

यावेळी न्यायालयाने तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्तकरून कुलकर्णी दापत्यांना गेले चार महिने दिलेले सरंक्षण काढून टाकले आणि अटकपूर्व जामिनाची पुढील सुनावणी 1 मार्चपर्यंत तहकूब ठेवली. 

कुलकर्णी दापत्यांनी गुंतवणूकदारांनाच नव्हेतर न्यायालयालयाचीही दिशाभूल केली आहे. कुंलकर्णी दांपत्य न्यायालयाच्या आदेशानंतर स्वत:हून न्यायालयात हजर झाल्याने गुंतवणूकदारांच्या ठेवी परत मिळतील असे आशेचे किरण होते. म्हणूनच न्यायायलाने आणखी एक संधी दिली. अन्यथा त्याच वेळी जामीन रद्द केला असता.

बुलढाणा बँकेला फटकारले

एखाद्या व्यकतीला कर्ज देताना त्यांने ठेवलेल्या तारणासंबंधी कागदपत्रांची शहनिशा न करता तुम्ही कर्ज द्यायला कसेकाय तयार झालात ? तुमच्या बँकेत असलेला पैसा हा सुध्द गुतवणूकदारांचा आहे याचे भान तुम्हाला नाही काय ? देशात दररोज 10-12 हजार कोटींचे नवनवे घोटाळे उघड होत आहेत. 12 कोटींचा डीडी डीएसकेंना कोणत्या आधारे दिला होता, असा सवालही न्यायालयाने उपस्थित करून बुलडाणा बँकेला चांगलेच फटकारले. आधी तारण ठेवलेल्या कागदपत्रांची शहनिशा करा आणि बँकेच्या संचालक मंडळाचा कर्ज देण्यासंदर्भात ठराव ध्यावा, अशी समजही बँकेला दिली.