Sun, Apr 21, 2019 13:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डीएसके राष्ट्रवादीच्या दारी; अजित पवारांनाच साकडे

डीएसके राष्ट्रवादीच्या दारी; अजित पवारांनाच साकडे

Published On: Feb 07 2018 1:56AM | Last Updated: Feb 07 2018 1:55AMमुंबई : खास प्रतिनिधी

आर्थिक अडचणीत सापडल्याने गुंतवणूकदारांच्या रोषाचा धनी ठरलेल्या बिल्डर डीएसकेंनी आता क्राऊड फंडिंगचा पर्याय आजमावण्यास सुरुवात केली असून, वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवरांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. मंगळवारी त्यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची भेट घेतली. आपल्याला व्यावसायिकांकडून होत असलेल्या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी मदत करा, असे आवाहन डीएसकेंनी या नेत्यांना केले असून, अजित पवार यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते. 

गुंतवणूकदारांचे सुमारे दोनशे कोटी रुपये डीएसकेंकडे अडकले आहेत. त्यांच्यावर गुन्हादेखील नोंदवण्यात आला असून, कुलकर्णींनी हायकोर्टात धाव घेतली आहे. मात्र, हायकोर्टाने कुलकर्णींनाच फटकारले असून, भीक मागा; पण गुंतवणूकदारांचे पैसे परत करा, असे सुनावले आहे. या रकमेपैकी पंचवीस टक्के म्हणजे 50 कोटी रुपये कोर्टात भरण्याचा आदेश न्यायमूर्तींनी दिला आहे. या व्यावसायिक आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी आज डी. एस. कुलकर्णी यांनी अजित पवार यांचे सहकार्य मागितले.