Wed, Jul 08, 2020 07:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › संकटग्रस्त महाराष्ट्रावर शक्तीशाली 'निसर्ग'ची धडक!

संकटग्रस्त महाराष्ट्रावर शक्तीशाली 'निसर्ग'ची धडक!

Last Updated: Jun 03 2020 2:10PM
रायगड : पुढारी वृत्तसेवा 

संकटग्रस्त निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर (रायगडात  अलिबागजवळ श्रीवर्धन, दिवेआगर येथे) धडकले आहे. चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूचा परिघ 60 किलोमीटर आहे. वादळ किनाऱ्यावर धडकताना (लँडफॉल) वाऱ्यांचा वेग १०० किलोमीटर प्रतितास होता.

वादळाने आता उरणच्या दिशेने अग्रेसर झाल्याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निशी चौधरी यांनी दिली. निसर्गने कोकण किनारपट्टीला धडक दिल्याने मुंबईसह रायगड, पुणे, नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. निसर्गचे पुढील तीन तास महत्त्वपूर्ण आहेत. 

संकटग्रस्त निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर (रायगडात  अलिबागजवळ श्रीवर्धन, दिवेआगर येथे) धडकले आहे. चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूचा परिघ 60 किलोमीटर आहे. वादळ किनाऱ्यावर धडकताना (लँडफॉल) वाऱ्यांचा वेग १०० किलोमीटर प्रतितास होता. वादळाने आता उरणच्या दिशेने अग्रेसर झाल्याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निशी चौधरी यांनी दिली. 

निसर्गने कोकण किनारपट्टीला धडक दिल्याने मुंबईसह रायगड, पुणे, नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. निसर्गचे पुढील तीन तास महत्त्वपूर्ण आहेत. निसर्ग चक्रिवादळाचा सर्वांधिक रायगड जिल्ह्याला बसला आहे. महावितरणने वादळ जाणाऱ्या रायगड जिल्ह्यासह उरण आणि पनवेल विभागातील ५७ उच्च आणि अतिउच्च दाबाने विद्युत पुरवठा करणाऱ्या उपकेंद्रातील विद्युत पुरवठा खंडीत केला आहे.

चक्रीवादळाने पोल पडणे, विद्युत वाहिन्या कोसळणे आदी घटना घडू नये, यासाठी महावितरणाने रायगडमधील ४६, उरण ३ आणि पनवेल विभागातील ८ अतिउच्च व उच्च दाबाचे उपकेंद्रातील पुरवठा बंद केला आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत हे वादळ या जिल्ह्यातून वाहणार असल्याने तोपर्यंत विद्युत पुरवठा खंडीत राहणार आहे. 

तीनंतर जसजसे वादळ पुढे सरकेल त्यानुसार हळूहळू पुरवठा सुरू करण्याबाबत स्थानिक कार्यालयाकडून प्रयत्न केला जाणार आहे. कल्याण परिमंडळ मधील विद्युत पुरवठा सुरळीत सुरू असून भांडूप परिमंडळात वाशी विभागात वाशी स्टेशन,  जुहूगाव, कोपरखैरणे, ऐरोली, बेलापूर  आणि तुर्भे विभागातील विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. 

तर कोकण विभागात रायगड व्यतिरिक्त इतर कुठल्याही जिल्ह्यातील पुरवठा खंडीत केला नसल्याचे सांगण्यात आले.  ठाणे ग्रामीण, नाशिक ग्रामीण, नाशिक शहर, मालेगाव, धुळे, जळगाव हे जिल्हे कोकण विभागात आहेत.