Tue, Feb 18, 2020 00:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बसमधून मगरींची तस्करी; तीन जणांना अटक

बसमधून मगरींची तस्करी; तीन जणांना अटक

Published On: Sep 17 2019 5:35PM | Last Updated: Sep 17 2019 5:35PM
ठाणे : प्रतिनिधी

खाजगी प्रवासी बसमधून दुर्मिळ मगरींच्या वाहतूकीचा भांडाफोड ठाणे वनक्षेत्रपाल पथकाने केला. यावेळी पथकाने छोट्‍या दोन मगरींसह तीघांना अटक केली आहे. 

या विषयी अधिक माहिती अशी की, खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसच्या डिकीमधून मगरींची तस्करी होत असल्‍याची माहिती वनक्षेत्रपात पथकाला मिळाली होती. यावरून ठाणे वनक्षेत्रपाल पथकाने ठाण्याकडून बोरोवलीकडे जाणाऱ्या एमएच 12 क्यूडब्ल्यू 9617 या बसची तपासणी केली. यावेळी पथकाला त्या बसच्या डिकीमध्ये 2 जिवंत मगरी आढळून आल्‍या. या प्रकरणी वन विभागाच्या पथकाने बस चालक मोहंमद अब्दुल रहीम हाफिज (वय : 33, राहणार-बंडलगुडा, हैद्राबाद) यांच्यासह खुद्दुस लतीफ बैग (वय-38, राहणार औराड, जिल्हा, बिदर, कर्नाटक), शिवाजी जी बलाया (वय : 28, हैद्राबाद) या तिघांना अटक केली आहे. 

पोलिसांनी या तिघांची चौकशी केली असता, त्यांनी मगरीची तस्करी करीत असल्याची कबुली दिली आहे. त्यांनी या मगरी कोठून आणल्‍या व कोणास विक्री करणार होते याची चौकशी सुरू असल्याची माहिती उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी पुढारीला दिली.