Wed, Sep 18, 2019 22:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण-डोंबिवलीत शेकडो आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हे

कल्याण-डोंबिवलीत शेकडो आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हे

Published On: Jan 04 2018 7:16PM | Last Updated: Jan 04 2018 7:16PM

बुकमार्क करा
कल्याण (वार्ताहर) : पुढारी ऑनलाईन

भीमा कोरेगाव येथे झालेल्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले असून, कल्याणमध्ये बुधवारी आंदोलनकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात रास्ता रोको, तोडफोड करण्यात आली. बुधवारी सिद्धार्थ नगर येथे झालेल्या तोडफोड व हाणामारी प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी २२ जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी शेकडो शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी कोळशेवाडी पोलीस स्थानकात निषेध नोंदवला. या वादात शिवसेनेचा काही संबंध नसून एसीपी वाडेकर यांनी अन्यायकारक कारवाई करत शिवसैनिकांना ताब्यात घेतल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

तसेच एसीपी वाडेकर यांचे निलंबन करावे, अशी मागणी देखील करण्यात आली. कारवाई न झाल्यास उग्र आंदोलन करु, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. डोंबिवलीतील भाजप मंत्र्यांच्या इशाऱ्यावर पोलिस अधिकारी काम करत आहेत, असा गंभीर आरोप शिवसेनेने यावेळी केला.

शेकडो आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हे 

भीमा कोरेगाव येथील घटनेनंतर कल्याणमध्ये झालेल्या आंदोनानंतर या परिसरातील १०१ आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मोर्चा काढण्याचा कोणताही वैध परवाना नसताना बेकायदेशीर जमाव करुन पोलिसांच्या कामकाजात अडथळा निर्माण करणे, मनाई आदेशाचा भंग करणे याप्रकरणी भा.द.वि. कलम ३५३, ३३२, १४१, १४२, १४३, १४५, १४९, १०९, ११४ प्रमाणे व महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) प्रमाणे बाजारपेठ आणि मानपाडा पोलिस स्थानकात गुन्हेदाखल करण्यात आले आहेत.