Wed, Mar 27, 2019 00:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात महिलांसाठी समुपदेशन हेल्पलाईन; देशातील पहिलीच सेवा 

राज्यात महिलांसाठी समुपदेशन हेल्पलाईन; देशातील पहिलीच सेवा 

Published On: Mar 01 2018 8:18PM | Last Updated: Mar 01 2018 8:18PMमुंबई : वृत्तसंस्था 

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने राज्यात महिलांसाठी समुपदेशन हेल्पलाईन प्रारंभ केली जाणार असून देशातील अशाप्रकारची ही पहिलीच सेवा असणार आहे. या हेल्पलाईनचा नंबर त्याच दिवशी जाहीर केला जाईल, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली. 

नैराश्याने ग्रासलेल्या महिलांना या हेल्पलाईनच्या माध्यमातून मदत केली जाणार असून त्यासाठी आयोगाने एका समुपदेशकाची नियुक्‍ती केली आहे. महिलांचे प्रश्‍न, हक्‍क आणि गरज पडल्यास कायद्याचा आधार कसा घ्यावा, याची सविस्तर माहिती हेल्पलाईनच्या माध्यमातून दिली जाईल, असेही रहाटकर यांनी सांगितले. 

संपूर्ण राज्यातून या हेल्पलाईनवर फोन करता येणार असून सध्या दोन नंबर दिले जाणार आहेत. गरज पडल्यास आणखी नंबर वाढण्यात येतील, अशी माहितीही त्यांनी दिली. या हेल्पलाईनवर येणार्‍या तक्रारी तसेच कामकाजची संपूर्ण माहिती ठेवण्यासाठी एक विशेष सॉफ्टवेअरदेखील तयार करण्यात आले आहे. हेल्पलाईनला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहून त्यात योग्य ते बदल केले जाणार असल्याची माहितीही रहाटकार यांनी दिली.