Wed, Sep 19, 2018 21:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंबरनाथमध्ये नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्‍ला

अंबरनाथमध्ये नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्‍ला

Published On: Jun 02 2018 2:02AM | Last Updated: Jun 02 2018 1:29AMअंबरनाथ : प्रतिनिधी

नाला बांधणीमध्ये दुकान तुटत असल्याने झालेल्या वादातून नगरसेविकेच्या पतीवर जिवघेणा हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री अंबरनाथमध्ये घडली. अजित काळे असे या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात विनोद माने आणि प्रवीण माने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस दोघांचा शोध घेत आहेत. 

अंबरनाथ शहराच्या पूर्व भागातील मोतीराम पार्क परिसरात रस्त्यालगत नाला बांधणीचे काम सुरू आहे. या नाला बांधणीमध्ये येथील रहिवाशी असलेले विनोद माने यांचे दुकान बाधीत होत आहे. यावरून विनोद आणि नगरसेविका रेश्मा काळे यांचे पती अजित काळे यांच्यात वाद झाला. याचवेळी विनोद याने आपल्याकडील लोखंडी रॉडने अजित यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. एवढेच नाही तर विनोदचा भाऊ प्रवीण याने अजित यांच्या गुप्‍तांगावर लाथ मारली.

या हल्ल्यात अजित हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना अंबरनाथ येथील चौधरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर आरोपी विनोद माने आणि त्याचा भाऊ प्रविण माने हे दोघेही फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.