Tue, Jun 02, 2020 05:22
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोरोनाचा भडका उडाल्यास खासगी दवाखान्यांवर राज्य शासनाचे नियंत्रण

कोरोनाचा भडका उडाल्यास खासगी दवाखान्यांवर राज्य शासनाचे नियंत्रण

Last Updated: Mar 30 2020 1:21AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोरोना विषाणूच्या साथीचा भडका उडालाच तर सर्व खासगी डॉक्टर्स आणि खासगी दवाखाने शासकीय नियंत्रणात येणार आहेत. तसा  शासन निर्णय शुक्रवारी सरकारने जारी केला. राज्यात लागू झालेल्या साथरोग अधिनियम  कायद्यानुसार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदे (एमएमसी)कडे नोंदणीकृत डॉक्टरांना कोरोना संसर्ग आजाराच्या आपत्कालीन परिस्थितीत खासगी डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ आणि नर्सिंग आदी व्यावसायिकांना वैद्यकीय सेवा पुरविण्याबाबतचा शासन आदेश काढण्यात आला आहे. कोरोना संसर्गाचा भडका उडाल्यास राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांना आणि तेथे कार्यरत असणार्‍या डॉक्टरांसह सर्व स्टाफला शासन सांगेल वैद्यकीय सेवा पुरवावी लागणार आहे.

अधिनियमानुसार अधिकार आरोग्य संचालकांसह जिल्हाधिकारी व तत्सम अधिकार्‍यांना विशेषाधिकार प्राप्त झाले आहेत. याअंतर्गत कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी संबंधित प्राधिकारी जे आदेश देईल त्याचे पालन करणे क्रमप्राप्त असेल. राज्यातील सर्व रुग्णालयांचा ताबा घेण्यासह तेथील व्यवस्थापन व डॉक्टरांकडून परिपूर्ण सेवा घेण्याचा अधिकार मिळतो. 

आपत्कालीन परिस्थितीत आणि आवश्यकता भासेल तेव्हाच खासगी डॉक्टरांना बोलावले जाईल. यात खासगी डॉक्टरांसह, रुग्णालये व इतर संबंधित स्टाफचाही  समावेश आहे. सेवानिवृत्त डॉक्टरांचीसुद्धा सेवा घेतली जाईल. त्यांना प्रशासकीय व कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी दिली जाईल, असे वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक व साथरोग सक्षम प्राधिकारी डॉ. तात्याराव लहाने यांनी ‘पुढारी’ला सांगितले.