Tue, Jul 07, 2020 05:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात कोरोनाच्या पोलीस बळींचा आकडा २६ वर

राज्यात कोरोनाच्या पोलीस बळींचा आकडा २६ वर

Last Updated: May 31 2020 1:20AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोरोना रोगाने ग्रस्त असलेल्या अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यातील 58 वर्षीय सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा शनिवारी मृत्यू झाल्याची घटना घडली. रेल्वे पोलीस दलातील हा पहिला मृत्यू असून राज्यातील मृत पोलिसांचा आकडा 26 वर पोहोचला आहे.

सधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचे रहिवासी असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश हातणकर हे अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत होते. 24 मे रोजी त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. 27 मे रोजी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र उपचारांदरम्यान शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. मरोळ परिसरात पत्नी व मुलीसह राहणार्‍या हातणकरांच्या कुटुंबीयांवर पहाडच कोसळला आहे. 

दोन आयपीएस अधिकार्‍यांसह महाराष्ट्र पोलीस सेवेतील अधिकारी आणि अंमलदार अशा एकूण 2 हजार पार पोलीस कर्मचार्‍यांना आतापर्यंत कोरोनाने ग्रासले आहे. कोरोनाबाधित 175 पोलीस अधिकार्‍यांसह 1 हजार 155 अंमलदार अशा एकूण 1 हजार 330 पोलिसांवर राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.