बेस्टच्या परेल वसाहतीत कोरोनाचे रुग्ण

Last Updated: Apr 07 2020 1:00AM
Responsive image


मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाने मुंबई काबीज करण्यास सुरुवात केलेली आहे. बेस्टच्या परेल वसाहतीमधील के इमारतीमध्ये कोरोनाचे 2 रुग्ण आढळले आहेत,यामध्ये एक महिला आणि तिची 3 वर्षांच्या लहान मुलीचा समावेश आहे. तर लालबागच्या गणेशगल्ली येथे राहणार्‍या एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. लागण झालेले हे तिन्ही रुग्ण एकाच कुटुंबातील असून त्या महिलेचा पतीदेखील कोरोनाग्रस्त आहे. हे रुग्ण बेस्ट कर्मचारी नाहीत.

गणेशगल्ली येथे राहणाजया कुटुंबातील तरुण मुंबई विमानतळावर काम करतो. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे दोन दिवसांपूर्वी स्पष्ट झाले. त्यानंतर त्याचे आई-वडील,मुलगी आणि पत्नी यांची तपासणी करण्यात आली. आई,मुलगी आणि पत्नीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून वडिलांचा अहवाल अद्याप आलेला नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे खबरदारीचा उपाय म्हणून त्या व्यक्तीची पत्नी आपल्या मुलगीसह परेल येथील बेस्ट वसाहतीमध्ये वडिलांकडे रहाण्यास आली होती. तिचे वडील बेस्टमध्ये कार्यरत आहेत. त्या व्यक्तीला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर मुलगी,आई आणि पत्नी यांना हिरानंदानीमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती स्थानिक नगरसेवक आणि बेस्ट समिती सदस्य अनिल कोकीळ यांनी दिली. के इमारत ही पूर्णपणे सील करण्यात आली असून निर्जंतुकीकरण करण्याचे काम करण्यात येणार आहे.तसेच त्या कुटुंबाच्या संपर्कात कोण-कोण आले आहे,याची माहिती गोळा करण्यात येत आहे.

घरातील सगळेच हायरिस्कवर

माहेरी आल्यामुळे माहेरच्या लोकांनादेखील हायरिस्कवर ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये बडील,आई,भाऊ आणि आजीचा समावेश आहे.