Fri, Jul 03, 2020 03:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत कोरोना  रुग्णांनी 45 हजारांचा टप्पा ओलांडला

मुंबईत कोरोना  रुग्णांनी 45 हजारांचा टप्पा ओलांडला

Last Updated: Jun 06 2020 12:55AM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबईत शुक्रवारी कोरोना रुग्णांनी 45 हजारांचा टप्पा ओलांडला. शुक्रवारी एकाच दिवसात 1150 रुग्णांची भर पडल्यामुळे मुंबईतील रुग्णसंख्या  45 हजार 854 वर पोहोचली आहे. राज्यात शुक्रवारी कोरोनाच्या 2436 नवीन रुग्णांचे निदान झाल्याने राज्याची एकूण बाधितांची संख्या 80 हजार 229 झाली आहे.

बळींचा उच्चांक 

राज्यात शुक्रवारी आजवरच्या सर्वाधिक 139 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यात मुंबई 54, ठाणे 30, वसई विरार 1, कल्याण डोंबिवली 7, भिवंडी 1, जळगाव 14, नाशिक 3, मालेगाव 8, पुणे 14, सोलापूर 2, रत्नागिरी 5, औरंगाबाद 5, जालना 1, परभणी 2, लातूर 1, उस्मानाबाद 1 तर नांदेड येथे 1 रुग्णाचा मृत्यू झाला. मृत्यूंपैकी 75 पुरुष तर 64 महिला आहेत. नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 27 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत.

मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा फुगत चालला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत कोरोना रुग्णसंख्या पन्‍नास हजारांपर्यंत जाण्याची भीती आहे.