Thu, Mar 21, 2019 01:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई विद्यापीठाच्या सुवर्णकन्यांचा दीक्षान्त गौरव!

मुंबई विद्यापीठाच्या सुवर्णकन्यांचा दीक्षान्त गौरव!

Published On: Jan 12 2019 1:32AM | Last Updated: Jan 12 2019 1:19AM
मुंबई : प्रतिनिधी 

मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यात गोल्ड मेडल्सवर गतवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच मोहोर उमटवली. 40 सुवर्ण पदक विजेत्यांमध्ये तब्बल 33 मुलींचा समावेश आहे.  प्रमुख पाहुणे नोबेल विजेते सर रिचर्ड जॉन रॉबर्ट्स, राज्यपाल सी. विद्यासागर राव, कुलगुरू प्रोफेसर सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्रोफेसर रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते शुक्रवारी थाटात झालेल्या दीक्षान्त सोहळ्यात ही पदके प्रदान करण्यात आली. सहा विद्यार्थ्यांनी प्रत्येकी दोन-दोन पदके मिळवली आहेत तर विधी या शाखेतील भूमी दफ्तरी व पार्श्व बानखरिया या दोन्ही विद्यार्थ्यांनी प्रत्येकी चार-चार पदके मिळवली आहेत.