कंत्राटदारांच्या नोंदवहीत सेना कनेक्शन?

Last Updated: Nov 17 2019 1:29AM
Responsive image


मुंबई : प्रतिनिधी 

मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांवर टाकलेल्या धाडीत आयकर विभागाला काही पुरावे सापडले आहेत. यात महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांसह मातोश्रीच्या खास मर्जीतील नेता अडकणार असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या नेत्याच्या पत्नीचे नावही यात असल्यामुळे शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

आयकरने कंत्राटदारांच्या कार्यालयासह त्यांच्या घरावर टाकलेल्या धाडीत काही पुरावे सापडले आहेत. यात कंत्राटदाराकडे असलेल्या हिशोबाच्या नोंदवहीमध्ये कोणाला किती पैसे दिले, याची नोंद असल्याचे समजते. यात महापालिकेतील शिवसेनेच्या काही नगरसेवकांसह शिवसेनेच्या एका नेत्याचे नाव असल्याची चर्चा आहे. या नेत्याचे महापालिकेतील आर्थिक व्यवहारावर लक्ष असल्यामुळे त्यांच्याच सांगण्यावरून कंत्राटदारांना कंत्राट मिळत असल्याने संशय व्यक्त करण्यात येत आहे.  विशेष म्हणजे मिळालेल्या पुराव्याचा आधार घेत, आयकरने अन्य पुरावे जमा करण्यास सुरूवात केली आहे. हे पुरावे जमा झाल्यानंतर नेत्याच्या संपत्तीची माहिती ईडीला देण्यात येणार असल्याचे समजते.