Tue, Nov 13, 2018 10:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बांधकाम व्यावसायिक आसिफ झोजवाला यांची आत्महत्या  

बांधकाम व्यावसायिक आसिफ झोजवाला यांची आत्महत्या  

Published On: Mar 05 2018 11:43PM | Last Updated: Mar 05 2018 11:43PMकल्याण : वार्ताहर

कल्याण मधील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व एमसीएचआयचे सदस्य आसिफ झोजवाला यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने शहरात एकाच खळबळ उडाली असून, मात्र आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

कल्याण पश्चिमेतील कल्याण मुरबाड रोडवरील राणी मॅन्शन येथे आसिफ झोजवाला राहत होते. सोमवारी  सायंकाळी त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आसिफ यांचा मृतदेह महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आला असून,  या प्रकरणाचा अधिक तपास महात्मा फुले पोलिस ठाण्याचे पोलिस करीत आहे. आसिफ झोजवाला भाजपच्या अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी होते.