Sun, Mar 24, 2019 04:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बांधणार 30 हजार किमी लांबीचे रस्ते : मुख्यमंत्री 

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बांधणार 30 हजार किमी लांबीचे रस्ते : मुख्यमंत्री 

Published On: Apr 17 2018 2:27AM | Last Updated: Apr 17 2018 12:44AMमुंबई : प्रतिनिधी

ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रत्येक गाव रस्त्याने जोडणे आवश्यक आहे. त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून 30 हजार किमीच्या रस्त्यांचे जाळे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. डिसेंबर 2019 पूर्वी राज्यातील रस्ते विकासाची पूर्ण करावीत. तसेच हायब्रिड अ‍ॅन्युईटी रस्त्यांसाठी तातडीने कार्यारंभ आदेश देऊन पावसाळ्यापूर्वी कामे सुरु करावीत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

हायब्रिड अ‍ॅन्युईटी रस्त्यांची कामे आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात घेतला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 30 हजार कि.मी. लांबीच्या रस्त्यांने उद्दिष्ट असून 14 हजार 844 कि.मी. लांबीच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. आत्तापर्यंत 4452 कि.मी. लांबींच्या रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहेत. 6756 कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे काम पूढील महिन्यात सुरु होणार असून उर्वरित कामांसाठी सप्टेंबर पर्यंत कार्यारंभ आदेश देऊन ऑक्टोबर पासून प्रत्यक्ष कामास सुरूवात करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

हायब्रिड अ‍ॅन्युईटी अंतर्गत 195 रस्त्यांचे काम हाती घेण्यात येणार असून 9238 कि.मी. लांबीचे रस्ते केले जाणार आहेत. मार्च 2018 मध्ये नव्याने 21 कामांना मंजुरी देण्यात आली असून त्या माध्यमातून 1001 कि.मी. लांबीचे रस्ते तयार होणार आहेत. या कामांसाठी 44 निविदा मंजुर करण्यात आल्या असून पावसाळ्यापूर्वी कामे सुरु करावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या. या योजनेंतर्गत मुंबई विभागात 1402 कि.मी., औरंगाबाद विभागात 1920 कि.मी., नाशिक विभागात 1257 कि.मी, पुणे विभागात 1775 किं.मी. लांबीच्या रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. 

शासकीय इमारती उर्जा कार्यक्षम प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे 8.55 लक्ष युनिट वीजेची बचत होत असून त्यामुळे 98 लाखांची बचत झाली आहे. राजभवन, आमदार निवास, रवी भवन, हैद्राबाद हाऊस, पुणे येथील राजभवन, सेट्रल बिल्डींग, औंध येथील जिल्हा रुग्णालय, सोलापूर जिल्हा रुग्णालय,मुलुंड येथील राज्य कामगार विमा रुग्णालय, बांधकाम भवन, जीटी रुग्णालय, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूरचे सीपीआर रुग्णालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व औरंगाबाद खंडपीठ या इमारती या प्रकल्पांतर्गत पूर्ण झाल्या आहेत. आतापर्यंत 2,11,615 ट्युब लाईट, 71,327 पंखे, 1,670 वातानुकुलीत यंत्रे बदलण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. 

mumbai, Construction of the project, through, Chief Minister Gram Sadak Yojana, 30 thousand km roads,