Fri, Nov 16, 2018 15:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › संविधान बचाव रॅलीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करणार : मुंबई पोलिस

संविधान बचाव रॅलीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करणार : मुंबई पोलिस

Published On: Jan 26 2018 5:43PM | Last Updated: Jan 26 2018 5:43PMमुंबई : प्रतिनिधी

प्रजासत्ताक दिनानिमित्त विरोधकांनी मुंबई येथे संविधान बचाव रॅली काढली होती. या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जेडीयू नेते शरद यादव, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी, तुषार गांधी, राजू शेट्टी यांच्यासह अनेक नेत्यांनी सहभाग घेतला. मात्र आता ही रॅली आयोजकांना अडचणीत आणणार आहे. या रॅलीची आयोजकांनी परवानगीच काढली नसल्याने आयोजकांवर मुंबई पोलिस गुन्हा दाखल करणार आहेत.

ही रॅली मंत्रालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून सुरु होऊन गेट वे ऑफ इंडिया पर्यंत निघाली. या रॅलीमध्ये आयोजकांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरें यांना देखील सहभागी होण्याचे आवाहन केले होते.