Tue, Jun 18, 2019 22:20



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेवरून राजकारण नको

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेवरून राजकारण नको

Published On: Jun 10 2018 1:48AM | Last Updated: Jun 10 2018 1:33AM



मुंबई : प्रतिनिधी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमक्यांची पत्र येत असतील, तर हा विषय गंभीर आहे. गृहविभागाने याची दक्षता घेऊन सत्य परिस्थिती काय, याची माहिती दिली पाहिजे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून आम्हाला राजकारण करायचे नाही, भाजपनेही तसा प्रयत्न करू नये, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांना धमकीचे पत्र आले आहे. पंतप्रधानांना माओवाद्यांपासून धोका आहे, अशा बातम्या येत आहेत. भाजप प्रवक्त्यांकडून यासंदर्भात पत्रे दाखवली जात आहेत. मात्र, सरकारकडून याबाबत अधिकृतपणे कोणीही बोलत नाही. पुणे पोलिस, राज्याच्या पोलिस महासंचालकांनी या वृत्ताबाबत अधिकृतपणे काहीच स्पष्ट केलेले नाही. देशाचे गृहमंत्री याबाबत काही बोलले नाहीत. सरकारी वकिलाने न्यायालयामध्ये हा विषय मांडला नाही. या गंभीर विषयाचे राजकारण करण्यापेक्षा उच्चस्तरीय चौकशी करावी.  

खरोखरच धोका असेल, तर पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांची सुरक्षा वाढवली पाहिजे व सरकारने या प्रकरणी अधिकृत निवेदन करावे, असे चव्हाण म्हणाले.