होमपेज › Mumbai-Thane-Raigad › समविचारी पक्षांची महाआघाडी करण्यास काँग्रेस तयार : अशोक चव्हाण

समविचारी पक्षांची महाआघाडी करण्यास काँग्रेस तयार : अशोक चव्हाण

Published On: Jun 09 2018 5:25PM | Last Updated: Jun 09 2018 5:25PMमुंबई : प्रतिनिधी

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपा विरोधातील धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांची महाआघाडी करून निवडणुका लढण्याचा निर्णय प्रदेश काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकले असून, मित्र पक्षांकडून त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळणे अपेक्षित असल्याचे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

कर्नाटक निवडणूक निकालानंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात  जेडीएस सोबतच्या आघाडीमुले शक्य झाले. असाच प्रयोग आगामी निवडणुकांपूर्वी करून धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची महाआघाडी करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. शिवसेना-मनसे जरी भाजपच्या विरोधात असले तरी त्या पक्षांची विचारधारा ही काँगेस व आमच्या मित्रपक्षांपेक्षा वेगळी असल्याने त्याना सोबत घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचे चव्हाण यांनी मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर बोलताना स्पष्ट केले.