Sun, Sep 23, 2018 09:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काँग्रेस कार्यालयावरील हल्‍ला; मनसेने जबाबदारी स्‍वीकारली 

काँग्रेस कार्यालयावरील हल्‍ला; मनसेने जबाबदारी स्‍वीकारली 

Published On: Dec 01 2017 11:48AM | Last Updated: Dec 01 2017 11:53AM

बुकमार्क करा

मुंबई: पुढारी ऑनलाईन

मुंबई काँग्रेस कार्यालयाची शुक्रवारी सकाळी काही अज्ञातांनी तोडफोड केली. शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी कार्यालयात कोणीही जबाबदार पदाधिकारी उपस्थित नव्हते. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्वीट करुन कॉंग्रेस कार्यालयावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा संजय निरुपम यांच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले असून ईट का जवाब पत्थर से मिलेगा असा इशाराही त्यांनी ट्‌विटरव्‍दारे दिला आहे.