Wed, Jan 16, 2019 19:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काँग्रेस म्हणते; पंतप्रधान मोदींनी GDP वाढवला?

काँग्रेस म्हणते; पंतप्रधान मोदींनी GDP वाढवला?

Published On: Jun 09 2018 5:35PM | Last Updated: Jun 09 2018 5:18PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

लोकसभा निवडणुकीवेळी भारतीय जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवणाऱ्या पंतप्रधान मोदी आणि भाजपची आता खिल्ली उडवली जात आहे. चांगल्या दिवसांसोबतच भारताला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी एकूण देशांतर्गत उत्पादन वाढवण्यात येईल अशा गप्पाही भाजपने केल्या होत्या. पण, आता याही मुद्यावरून भाजपवर निशाणा साधला जात आहे. 

काँग्रेसने देशाच्या उत्पादन वाढीचा दरावरून टीका केली आहे. यासंदर्भातील एक ट्विट त्यांनी केले आहे. ‘मोदीजी  म्हणाले होते #GDP वाढवू, त्यांचा म्हणायचा अर्थ Gas, Diesel व Petrol  होता ?’ असे ट्विट महाराष्ट्र काँग्रेसने केले आहे. 

सध्याच्या महागाईत मोदींनी जी फॉर ग्रोस, डी फॉर डोमेस्टीक आणि पी फॉर प्रोडक्ट न वाढवता गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती मात्र वाढवल्याचेच काँग्रेसचे म्हणणे आहे.