Sun, Nov 18, 2018 13:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अध्यक्षांवरील अविश्‍वास ठरावावरून विधानसभेत गोंधळ

अध्यक्षांवरील अविश्‍वास ठरावावरून विधानसभेत गोंधळ

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावरील अविश्‍वासाचा ठराव मांडण्यासाठी विरोधकांनी आग्रही भूमिका घेतल्याने झालेल्या गदारोळात विधानसभेचे कामकाज तीनवेळा तहकूब करण्यात आले. विरोधकांनी अविश्‍वास ठराव दाखल केला असताना, तो चर्चेला न घेता मुख्यमंत्र्यांनी थेट अध्यक्षांवर विश्‍वासदर्शक ठराव मांडून लोकशाहीचा खून केल्याची टीका विरोधकांनी केली.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी, विधानसभेचे कामकाज नियमाने चालत नसल्याचा आरोप करून अध्यक्षांना घटनेने संरक्षण दिले असले तरी सत्तेला सहाय्य करणारे निर्णय त्यांना घेता येणार नाहीत. अध्यक्ष तसे वागत असतील, तर त्यांच्यावर अविश्‍वास ठराव आणण्याची तरतूद  आहे. तसा ठराव आणला असताना मुख्यमंत्र्यांनी सभागृहात योग्यवेळी चर्चा करू, असे सांगूनही विश्‍वासदर्शक ठराव मांडून घटनेला हरताळ फासला आहे. अविश्‍वास ठराव विषयपत्रिकेत दाखवा, अशी मागणी त्यांनी केली.

दिलीप वळसे-पाटील यांनी यासंदर्भातील अनेक दाखले देत त्यावरील प्रक्रिया सांगितली. आपल्यावरही अविश्‍वास ठराव आला होता, तो आपण वाचलाही होता, असे ते म्हणताच अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यानंतर सत्ताधारी व विरोधकांत चर्चा होऊन आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो मागे घेतल्याची  आठवण करून दिली. मात्र, हे आपण सांगणारच होतो. आपण ते कशाला सांगितले, असे वळसे-पाटील  थेट नक्षलवादी ठरवतात व आमच्यामागे मात्र पोलिसी कारवाईचा ससेमिरा लावतात, अशी टीका त्यांनी केली.

भायखळा येथून आझाद मैदानात येणार्‍या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मोर्चेकरी थेट आझाद मैदानात जमा झाले होते.  राज्याच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या भीमसैनिकांमुळे आझाद मैदानाचा पूर्ण परिसर निळ्या झेंड्यांनी भरला होता. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व भिडेंना अटक केल्याशिवाय हा लढा संपुष्टात येणार नसल्याचे स्पष्ट केल्याचे आंबेडकर म्हणाले. मोर्चेकर्‍यांची गर्दी झाल्याने पोलिसांनी आझाद मैदानाच्या मुख्य भागात मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला.

या मोर्चासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. या मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी भारिप बहुजन महासंघाचे अनेक कार्यकर्ते ठाणे शहर अध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाण्याहून चालत घाटकोपर येथे आले. पोलिसांनी त्यांना तिथून पोलिस वाहनांद्वारे आझाद मैदानात आणले.

Tags : mumbai news, Confusion, Legislative Assembly, distrust resolution, President,


  •