Thu, Nov 15, 2018 06:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काँक्रिटीकरणामुळे पाणी मुरण्यास जागाच नाही

काँक्रिटीकरणामुळे पाणी मुरण्यास जागाच नाही

Published On: Jul 12 2018 1:42AM | Last Updated: Jul 12 2018 1:01AMमुंबई : प्रतिनिधी

शहराची भौगोलिक स्थिती त्यात शहरात वाढते काँक्रिटीकरण, खोलवरच्या अभ्यासाचा अभाव आणि भांगेची भरती हे मागील चार दिवसांच्या पावसात मुंबईच्या मुळावर आले आहे. काँक्रिटीकरणामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास जागाच शिल्लक राहिली नसल्याचे महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी बुधवारी स्थायी समितीत सांगितले. 

यावर उपाययोजना म्हणून पाणी जमिनीत जिरण्यासाठी सोसायट्या आणि उद्यानांच्या ठिकाणी खास जागा मोकळ्या सोडणे बंधनकारक करण्यात येणार असून पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी लवकरच वरळीमध्ये एक विशेष नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी जाहीर केले. 

पालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे पाणी तुंबणार्‍या 205 ठिकाणांपैकी 105 ठिकाणी यावर्षी पाणी तुंबले नसल्याचा दावा आयुक्तांनी केला. ज्या ठिकाणी पाणी साचले त्या ठिकाणच्या पाण्याचा निचरा काही वेळातच झाल्याचे त्यांनी सांगितले.स्पष्ट केले. मुंबईत अतिवृष्टी सुरू असताना तब्बल चार हजार कर्मचारी-अधिकारी फिल्डवर काम करीत असल्याचे सांगितले. 

तुंबईवरून विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव, समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी स्थायी समितीचे कामकाज सुरू होताच पालिकेवर हल्ला चढवला. पालिकेची यंत्रणा सपशेल फेल ठरली असून नालेसफाई, पंपिग स्टेशनसाठी कोट्यवधी रुपये खर्चून शहर दरवर्षी पाण्यात जात आहे. त्यामुळे पाणी का तुंबते ठरलेली कारणे सांगत बसू नका, असे विरोधकांनी सांगितले. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आयुक्तांना पालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्याचे निर्देश दिले. यावेळी आयुक्त अजय मेहता यांनी हिंदमातासारख्या ठिकाणी केबल, लाइटची वायिंरग असल्यामुळे काम करताना मर्यादा आल्याचे सांगितले.