होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आणखी एका अभिनेत्रीची वकील सिद्दीकीविरोधात तक्रार

आणखी एका अभिनेत्रीची वकील सिद्दीकीविरोधात तक्रार

Published On: Mar 20 2018 1:49AM | Last Updated: Mar 20 2018 1:24AMठाणे : प्रतिनिधी

अवैध सीडीआर प्रकरणात अटकेत असलेले प्रख्यात वकील रिझवान सिद्दीकी यांच्यावर आणखी आरोप वाढले असून दक्षिणेतील अभिनेत्री आरती नागपाल हिने देखील सिद्दीकी विरोधात ठाणे क्राईम ब्रांचकडे तक्रार दाखल केली आहे. 

रिझवान सिद्दीकी यांना ठाणे पोलिसांनी अवैध सिडीआरप्रकरणी अटक केली आहे. तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. ठाणे पोलिसांनी याप्रकरणी साक्षीदार व तक्रारदार यांचे जवाब नोंदविणे सुरु केलेले आहे. याबाबत सोमवारी आरती नागपाल हिने ठाणे गुन्हे शाखेत जाऊन आपला जवाब नोंदविला आहे. 

आरती हिने हॉलिडे, गुड्डू, खुद्दार या हिंदी सिनेमात काम केलेले असून शक्ती आणि सावधान इंडिया या सिरीयलमध्ये काम केलेले आहे. या सीडीआर प्रकरणात अटक असलेला वकील रिझवान सिद्दीकी यांनी आपल्या घटस्फोट प्रकरणात ट्रान्सक्रिप्ट आणि अत्यंत गोपनीय माहिती न्यायालयात दाखल केली असल्याचे आरतीने सांगितले आहे. या बाबतही आरतीचे सीडीआर काढले गेल्याचा संशय आरती नागपालला आहे. याबाबत तिने गुन्हे शाखेत आपला जवाब नोंदविला आहे. 

Tags : lawyer Siddiqui, actress, Complaint, mumbai news