Fri, Apr 26, 2019 09:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बारामतीत बोगस ग्रामपंचायत; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

बारामतीत बोगस ग्रामपंचायत; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Published On: Jan 06 2018 11:25AM | Last Updated: Jan 06 2018 11:25AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील बारामती येथे बोगस ग्रामपंचायत आढळून आल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.

बारामती शहरालगत तत्कालिन गट विकास अधिकारी यांनी त्रिशंकू भागात स्वत: एका ग्रामसेवकाची नियुक्ती केली आणि केवळ कागदपत्रांवर ग्रामपंचायत दाखवून मागासवर्गीयांसाठी असलेला करोडो रूपयांचा सरकारी निधी लाटलेला आहे, या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींना अटक करावी, अशी मागणी बारामतीमधील सामाजिक कार्यकर्ता पोपट विठोबा धवडे यांनी केली आहे.