Wed, Sep 19, 2018 12:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गोल्डन क्विन मधुरिकाचे मुंबई विमानतळावर जंगी स्वागत

गोल्डन क्विन मधुरिकाचे मुंबई विमानतळावर जंगी स्वागत

Published On: Apr 17 2018 2:35PM | Last Updated: Apr 17 2018 2:36PMठाणे : खास प्रतिनिधी 

राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवुन देणारी ठाण्याची सुवर्ण कन्या मधुरिका  पाटकर मंगळवारी दुपारी मुंबईत दाखल झाली. भाजप आमदार संजय केळकर यांनी तिचे विमानतळावर  सरकार आणि ठाणेकरांतर्फे  स्वागत केले.  यावेली मधुरिकाचे आई-वडिल आणि सासरची मंडळी देखील उपस्थित होती. 

Image may contain: 1 person, smiling

ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिला टेबल टेनिस गटात सिंगापूरसारख्या बलाढ्य संघाला पराभूत करून भारतीय महिलांनी एतिहासिक कामगिरीची नोंद केली होती. तिच्या सुवर्ण कामगिरीच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी ४ वाजता तिचे ठाण्याचे प्रवेशद्वार असलेल्या आनंदनगर जकात नाका  येथे  ठाणेकरांच्यावतीने जंगी स्वागत करण्यात येणार आहे. तिच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु आहे. 

Image may contain: 5 people, people smiling, indoor