Sat, May 25, 2019 22:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भांडुपमध्ये कॉलेज तरुणाची हत्या 

भांडुपमध्ये कॉलेज तरुणाची हत्या 

Published On: Jul 27 2018 1:48AM | Last Updated: Jul 27 2018 1:26AMमुंबई : प्रतिनिधी

भांडूपमध्ये प्राणघातक हल्ल्यांचे सत्र सुरुच असून येथील एका कॉलेज तरुणाला कॉलेजच्या बाहेरच चाकूने भोसकून त्याची निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी घडली. प्रेमप्रकरणातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आली असून भांडूप पोलिसांनी या हत्येप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.

भांडूप पश्‍चिमेकडील टेंभीपाडा, रामनगरमध्ये राहात असलेला सुशीलकुमार वर्मा (17) हा मुलगा येथील रामकली ज्युनियर कॉलेजमध्ये बारावीमध्ये शिकत होता. कॉलेजमध्ये परीक्षा सुरु असल्याने तो सव्वानऊच्या सुमारास कॉलेजमधून बाहेर पडला. यावेळी दोन ओळखीच्या कॉलेजमधील तरुणांनी खांद्यावर हात टाकून काही अंतर पुढे चालत नेले. तेथे दबा धरुन बसलेल्या काही तरुणांनी वर्मासोबत वाद घालून त्याच्यावर चाकूने सपासप वार करून  पळ काढला. 

भांडूप पोलिसांसह गुन्हेशाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत वर्माच्या मित्रांनी त्याला उपचारांसाठी मुलूंडच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी वर्माला मृत घोषीत केले. भांडूप पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून मारेकर्‍याचा शोध सुरू आहे.