Wed, May 22, 2019 10:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › संगीत क्षेत्रातला 'शुक्र तारा' निखळला : मुख्यमंत्री

संगीत क्षेत्रातला 'शुक्र तारा' निखळला : मुख्यमंत्री

Published On: May 06 2018 9:49AM | Last Updated: May 06 2018 9:49AMमुंबई :  प्रतिनिधी

ज्येष्ठ गायक अरूण दाते यांच्या निधनाने मराठी भावविश्वाला शब्दस्वर देणारा एक श्रेष्ठ भावगीत गायक आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली. अरूण दाते यांचे आज पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास निधन झाले.

मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, मराठी रसिकांमध्ये भावगीते लोकप्रिय करण्यात श्री. दाते यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या भावस्पर्शी मखमली आवाजात साजलेली अनेक गाणी अजरामर झाली असून त्यात विशेषतः  भातुकलीच्या खेळामधली  राजा आणिक राणी, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शुक्र तारा मंद वारा, स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला अशी अनेक गीते संस्मरणीय ठरली आहेत.  त्यांच्या निधनाने मराठी भावगीतांच्या क्षेत्रातील एक शुक्रतारा जणू निखळला आहे.

मराठी भावगीतातला शुक्रतारा निखळला ​​​-सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे

मराठी संगीत क्षेत्रातील सुप्रसिध्द भावगीत गायक अरुण दाते यांच्या निधनाने मराठी भावगीतातला शुक्रतारा निखळला अशा शब्दात सांस्कृतीक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.

तावडे आपल्या शोक संदेशात म्हणतात की, जवळपास ५०  वर्षाहून अधिक काळ दाते यांनी मराठी संगीतासाठी योगदान दिले. शुक्रतारा मंदतारा, अखेरचे येतील माझ्या, भातुकलीच्या खेळामधली, स्वरगंगेच्या काठावरती अशी विविध एकाहून एक सरस गाणी गाणारे आणि जगण्यावर प्रेम करायला लावणारे गायक श्री.दाते यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Tags : Cm devendra fadanavis, Tribute, arun date, minister vinod tavade