Mon, Nov 19, 2018 08:27



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा

प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा

Published On: Jun 14 2018 8:18AM | Last Updated: Jun 14 2018 8:17AM



पुणे : पुढारी ऑनलाईन 

राज्याच्या उच्चशिक्षण संचालनालयाने वित्त विभागाकडे सादर केलेल्या प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या आकृतीबंधाला येत्या सहा आठवड्यांत मान्यता देण्यात येणार आहे, अशी माहिती वित्त विभागाने नुकतीच प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयात दिली आहे. त्यामुळे प्राध्यापक पदभरतीचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या जुलै महिन्याच्या अखेर प्रत्यक्ष प्राध्यापक पदभरतीला सुरुवात होण्याची शक्यता असल्याची माहिती उच्चशिक्षण विभागातील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सेट, नेट, पीएचडी पात्रताधारकांचे आंदोलन सुरू होते. ४ जूनपासून पुण्यात पात्रताधारकांनी प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवून नियमित भरती सुरू करावी, या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरु केले होते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागपुरातही असेच आंदोलन सुरू होते.