Thu, Feb 21, 2019 13:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करणाऱ्यांनेच घेतली लाच

भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करणाऱ्यांनेच घेतली लाच

Published On: Mar 08 2018 1:48PM | Last Updated: Mar 08 2018 1:48PMनवी मुंबई: राजेंद्र पाटील 

राज्य सरकारने लाचेच्या गुन्ह्यांसंदर्भात चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या क्लास वन अधिकारी प्रभाकर पवार यांनी एका प्रकरणाची चौकशी सुरू असताना संबंधीत व्यक्तींकडे 40 हजार रूपयांची लाच मागितली.  या संदर्भातील पहिला हप्ता 25 हजार रूपये घेताना धुळे लाच लुचपत विभागाचे पोलीस उप अधिक्षक शत्रुघ्न माळी यांनी त्यांना रंगेहाथ पकडले. यामुळे नाशिक विभागातील कार्यालयात खळबळ उडाली आहे.

चौकशीसाठी नियुक्ती केलेला अधिकारीच लाखो निघाल्याने पवार यांनी आतापर्यंत केलेल्या चौकशी बाबत प्रश्न चिन्ह उभे राहिले आहेत. पवार यांच्याकडे 150 प्रकरणांची चौकशी करण्यासाठी सोपवले होते. त्यापैकी एकही चौकशी त्यांनी पूर्ण केली नाही. आतापर्यंत केलेल्या चौकशीपैकी केवळ 20 टक्केच अहवाल पाठवल्याचे समोर आले आहे. पवार हे 1996च्या बॅचचे अधिकारी आहेत. ते सध्या विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक वर्ग 1 येथे प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी या पदावर काम करत होते.