Sat, Nov 17, 2018 14:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सिनेव्हिस्टा स्टुडिओ आगीत एकाचा मृत्यू

सिनेव्हिस्टा स्टुडिओ आगीत एकाचा मृत्यू

Published On: Jan 08 2018 1:27AM | Last Updated: Jan 08 2018 1:26AM

बुकमार्क करा
विक्रोळी : वार्ताहर

कांजूरमार्ग येथील सिनेव्हिस्टा स्टुडिओला शनिवारी रात्री लागलेल्या आगीत ऑडिओ असिस्टंट गोपी सुरज वर्मा (20) याचा मृतदेह रविवारी सकाळी आढळला. स्टुडिओच्या वरच्या भागात अडकल्याने गोपी 100 टक्के भाजल्याचे अग्‍निशमन दलाच्या जवानांनी माहिती दिली.

विक्रोळी आणि कांजूरमार्गच्या मध्यावर गांधीनगर सिग्नलच्या बाजूला असलेल्या सिनेव्हिस्टा स्टुडिओला शनिवारी रात्री ही आग लागली होती. संपूर्ण स्टुडिओ जळून त्यात खाक झाला. एक दिवाण था, बेपनाह, हासील आणि मराठी मालिका अंजली या मालिकेचे चित्रीकरण सुरू असतानाच ही आग भडकली.