Thu, Jun 27, 2019 10:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ईडू चा पुणेकरांनाही गंडा

ईडू चा पुणेकरांनाही गंडा

Published On: Jan 13 2018 7:38AM | Last Updated: Jan 13 2018 1:48AM

बुकमार्क करा
चिपळूण : खास प्रतिनिधी

दामदुप्पट पैशांचे आमिष दाखवून चिपळूणवासीयांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणार्‍या ‘ईडू’च्या संचालकाला अटक झाल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. रवीकिरण बटुला याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे चौकशीला वेग आला आहे. दरम्यान, याच कंपनीने पुण्यात हडपसर येथेही कारभार थाटल्याची माहिती मिळत असून चिपळुणातील एका राजकीय कार्यकर्त्याने आणखी एक तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, ‘ईडू’ने किती लोकांची फसवणूक केली आहे, यांच्या चर्चा सुरू आहेत.

रत्नागिरी येथील क्राईम ब्रँचच्या चौकशीत 23 कोटी 60 लाखांपर्यंत व्यवहार झाल्याचे दिसून येत आहे. पोलिस निरीक्षक प्रदीप मिसर चौकशी करीत आहेत. संचालक बटुला याला शुक्रवारी सकाळी त्याच्या कार्यालयात नेऊन चौकशी करण्यात आली. या ठिकाणी गेले वर्षभर पन्‍नास ते साठ मुली कॉम्प्युटर ऑपरेटर होत्या.  आता याच कंपनीच्या नावाने पुणे हडपसर या ठिकाणी कार्यालय उघडण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे चिपळूण पोलिसांनी येथील फसवणुकीबाबत पुणे पोलिसांना माहिती दिली आहे.  चिपळुणातील गुंतवणुकदारांचे पैसे अडकल्याने हा खड्डा भरण्यासाठी पुण्यात नव्याने शाखा उघडण्यात आली. तेथे मिळणार्‍या पैशातून चिपळुणातील लोकांचे पैसे फेडले जाणार आहेत. मात्र, त्या ठिकाणी फसवणुकीचा धोका लक्षात घेऊन पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.  या प्रकरणी राकेश घोरपडे यांनी ‘ईडू’विरोधात शुक्रवारी सायंकाळी तक्रार दाखल केली आहे.  इम्तियाज मुकादम यांनी केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाला चालना मिळाली. आता दिवसेंदिवस फसवणूक झालेली नवनवीन प्रकरणे चर्चिली जात आहेत.