Sat, Jul 20, 2019 23:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चीनमध्ये ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ ठरला हिट!

चीनमध्ये ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ ठरला हिट!

Published On: Jun 11 2018 8:43PM | Last Updated: Jun 11 2018 8:43PMमुंबई :

शौचालयाच्या विषयावर बनलेला ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ हा अक्षयकुमार आणि भूमी पेडणेकर यांचा चित्रपट नुकताच चीनमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. चीनमध्ये ‘टॉयलेट हीरो’ या नावाने प्रदर्शित झालेला हा चित्रपट चांगलाच हिट ठरत आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विट केल्याप्रमाणे या चित्रपटाने चीनमध्ये पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर तुफान गल्‍ला जमवला. चित्रपटाने 2.36 दशलक्ष डॉलर्स अर्थात 15.96 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दरम्यान, विकएंडला हा चित्रपट किती कमाई करतो, याकडे लक्ष लागले आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. 11,500 स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.