Thu, Jul 18, 2019 01:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघर जिल्ह्यात ४,२७६ बालके कुपोषित

पालघर जिल्ह्यात ४,२७६ बालके कुपोषित

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

तलासरी : सुरेश वळवी

पालघर जिल्ह्यातील वाडा, पालघर, वसई, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, डहाणू, तलासरी या तालुक्यांतील आदिवासी गाव-पाड्यांत सुमारे 4,276 बालके कुपोषित आहेत. त्यापैकी 655 बालके अतितीव्र कुपोषित असल्याचे एका आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

वाडा तालुक्यात 410, विक्रमगड 308, जव्हार 342, मोखाडा 229, डहाणू 639, पालघर 616, वसई 389, तलासरी 248 आशा एकूण 3,181 अंगणवाड्या आहेत. यात जुलै 2017 च्या अखेरीच्या ग्राम बालविकास केंद्राच्या अहवालात वाडा 101, विक्रमगड 128, जव्हार 141, मोखाडा 41, तलासरी 18, डहाणू 156, पालघर 38, आणि वसईत 32 बालके तीव्र कुपोषित बालके (स्याम) असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मध्यम (म्याम) या कुपोषित बालकांच्या श्रेणीत वाडा 525, विक्रमगड 738, जव्हार 847, मोखाडा 264, तलासरी 328, डहाणू 384, पालघर 381, आणि वसई 154 याप्रमाणे जिल्ह्यात एकूण 3,621 मध्यम कुपोषित बालके आहेत. तीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित बालकांची पालघर जिल्ह्यातील एकूण संख्या 4,276 इतकी आहे. ऑगस्टमध्ये 2603 इतकी कुपोषित बालके असून यातील 511 बालके आजही तीव्र कुपोषित म्हणजे स्याम श्रेणीत आहेत, तर 2012 बालके मध्यम कुपोषित म्हणजेच म्याम श्रेणीत आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील 0 ते 6 वयोगटातील बालकांचा कुपोषित, भूकबळी आदी विविध कारणांमुळे झालेल्या बालमृत्यूचे प्रमाणदेखील अधिक आहे. एप्रिल 2017 ते ऑगस्ट 2017 अखेरपर्यंत डहाणू तालुक्यात 54, जव्हार 44, विक्रमगड 19, मोखाडा 11, पालघर 32, तलासरी 16, वाडा 13, वसई 15 याप्रमाणे जिल्ह्यभरात एकूण 204 कुपोषित बालके भूकबळी, विविध प्रकारच्या आजारांनी दगावली आहेत. यावरून जिल्ह्यात आदिवासी बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी राबवण्यात येणार्‍या योजना अथवा यंत्रणा किती कुचकामी आहेत, हे स्पष्ट झाले आहे.

अंगणवाडी सेविकांनी 11 सप्टेंबरपासून मानधन वाढीसाठी पुकारलेल्या संपकाळात 15 बालमृत्यू झाले. यादरम्यान अंगणवाडी केंद्रांतील बालकांना सकस आहार न मिळाल्याने पालघरमध्ये 11 ते 24 सप्टेंबर या कालावधीत 0 ते 1 वयोगटातील 10 कुपोषितांचा, तर 1 ते 6 या वयोगटातील पाच कुपोषित बालकांचा मृत्यू झाला.