Wed, Sep 19, 2018 18:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धक्कादायक; स्कायवॉकवर अल्पवयीन मुलांची बिअरपार्टी 

स्कायवॉकवर अल्पवयीन मुलांची बिअरपार्टी 

Published On: Apr 20 2018 10:02AM | Last Updated: Apr 20 2018 10:02AMडोंबिवली : कल्याण पूर्व-पश्‍चिमेला जोडणार्‍या स्कायवॉकवर गांजाडू आणि गर्दुल्ल्यांनी कब्जा केला असतानाच आता तर दिवसाढवळ्या याच स्कायवॉकवर चक्क दारू-बिअरच्या पार्ट्या रंगू लागल्याचे भयाण चित्र गुरुवारी दुपारी दिसून आले. त्यामुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहेत. कल्याण रेल्वे स्टेशनजवळील स्कायवॉक नागरिकांसाठी तयार करण्यात आला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून हा स्कायवॉक तयार केला असला तरी फेरीवाल्यांनी तो काबीज केला आहे.

याच स्कायवॉकवर गर्दुल्ले, गांजाडू, दारूड्यांचा जत्था कायम पडलेला असतो. गुरुवारी अशीच घटना समोर आली. याच स्कायवॉकखाली लोहमार्गचे का होईना पण पोलीस ठाणे आहे आणि स्कायवॉकवर दोन अल्पवयीन मुले बियर ढोसत बसले होते. या दोघांकडे काही नागरिकांचे लक्ष गेले. दोघे मुले घाबरली. नागरिकांमधील एकाने मोबाईलमधून चित्रीकरण सुरू केले. व्हिडीओ काढताना बघून त्यातील एकजण पळून गेला. 

दुसर्‍या मुलाला घेऊन नागरिक पोलीस ठाण्यात जात असताना एका नागरिकाने या मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ताब्यात घेतलेला मुलगा पळून गेला. हा स्कायवॉक नेमका कशासाठी तयार करण्यात आला आहे? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ही दोन्ही मुले कोण होती हे अजून समजले नाही. या घटनेमुळे स्कायवॉकवरून ये-जा करणारे कल्याणकर किती सुरक्षित आहेत याचा अंदाज लागू शकतो, असा सवाल योगेश तेलगोटे यांनी उपस्थित केला आहे.

Tags : Beer Party, Kalyan, Skywalk