Tue, Mar 26, 2019 12:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सार्वजनिक शौचालयात चिमुरडीवर बलात्कार

धक्कादायक; सार्वजनिक शौचालयात चिमुरडीवर बलात्कार

Published On: Jun 19 2018 1:31AM | Last Updated: Jun 19 2018 1:31AMडोंबिवली : वार्ताहर

शौचासाठी जाणार्‍या एका 8 वर्षीय चिमुरडीला चॉकलेटचे आमिष दाखवत तिला जबरदस्तीने पुरुषांच्या शौचालयात नेऊन वृद्धाने तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कल्याण-शिळ मार्गावरील सूचक नाका येथील नेतीवली टेकडीवर असलेल्या सार्वजनिक शौचालयात घडली. कमुनदास माणिकपूरे (65) असे नराधमाचे नाव आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच नराधम वृद्धास पोलिसांनी अटक केली आहे. 

बलात्कार केल्यानंतर कमुनदास याने तेथून पळ काढला. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या चिमुरडीने रडत रडत ही बाब घरच्यांना सांगितली. पीडितेच्या आईने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन कमुनदास याच्याविरोधात तक्रार दाखल करताच पोलिसांनी त्याला काही तासांतच बेड्या ठोकल्या. या आरोपीला सोमवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ही धक्कादायक घटना परिसरात वार्‍यासारखी पसरल्यानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

चॉकलेटचे आमिष दाखवून केले कुकर्म

पीडित चिमुरडी कल्याण पूर्वेकडील सूचक नाका टेकडी परिसरात आपल्या कुटुंबासह राहते. रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही पीडिता घराच्या परिसरात असलेल्या केडीएमसीच्या सार्वजनिक शौचालयात जात होती. इतक्यात त्याच परिसरात राहणार्‍या नराधम कमुनदास याने तिला अडवले. चॉकलेटचे आमिष दाखवले व तिला जबरदस्तीने पहिल्या मजल्यावरील पुरुषांच्या बाथरूममध्ये नेले. त्यानंतर भयभीत झालेल्या चिमुरडीने आरडाओरड केल्यामुळे तिचे तोंड रूमालाने बांधून विवस्त्र करत या लिंगपिसाटाने तिच्यावर पाशवी बलात्कार केला.