Sun, May 26, 2019 11:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आईला होणारा त्रास असह्य झाल्याने मुलाची आत्महत्या

आईला होणारा त्रास असह्य झाल्याने मुलाची आत्महत्या

Published On: May 23 2018 1:51AM | Last Updated: May 23 2018 1:23AMडोंबिवली : वार्ताहर

वडील आणि कुटुंबातील अन्य सदस्यांकडून आईला होणारा मनासिक व शारीरिक त्रास असह्य झाल्याने या महिलेच्या 16 वर्षीय मुलाने सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना डोंबिवलीत घडली. या प्रकरणी पीडित महिलेने पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दखल केला आहे. 

डोंबिवली पूर्व डीएनसी रोडला असलेल्या सुनीलनगरमधील आत्मसृष्टी सोसायटीत उमेश व कविता तेलंग हे जोडपे कुटुंबासोबत राहत होते. त्यांना हिमांशू तेलंग हा 16 वर्षांचा मुलगा होता. कविताला उमेश (42), सासू अनुराधा (67), नणंद निर्मला गुग्गील (48), दीर कैलास व जाऊ राधा हे सगळेजण या-ना-त्या कारणावरून मानसिक व शारीरिक त्रास देत होते. आपल्या आईला होणारा त्रास सहन न झाल्याने हिमांशूने 3 मे रोजी सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. 

या घटनेमुळे कविता यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. आपल्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत त्यांनी सोमवारी डोंबिवली पोलीस ठाण्यात पती आणि सासरच्या मंडळींविरोधात तक्रार नोंदविली.