Tue, Jul 23, 2019 10:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्र हाच केंद्राचा भरवशाचा भागीदार

महाराष्ट्र हाच केंद्राचा भरवशाचा भागीदार

Published On: Feb 19 2018 1:59AM | Last Updated: Feb 19 2018 1:59AMमुंबई : खास प्रतिनीधी

सबका साथ सबका विकास हे पंतप्रधानांचे घोषवाक्य सत्यात आणण्यासाठी महाराष्ट्र केंद्र सरकारला पूर्ण भरवशाने साथ देईल, अशी ग्वाही देताना मुंबईत झालेल्या मेक इन महाराष्ट्रमधून झालेले 61 टक्के करार पूर्णत्वास नेल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्र च्या उद्घाटन समारंभात बोलताना केला. याचवेळी 2020 पर्यंत अर्थव्यवस्थेचे उद्दीष्ट वन ट्रिलियन डॉलर ठेवण्याचा आपला ध्यास असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 

मुंबईत सुरू झालेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी  मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या उज्जवल भवितव्याचे चित्रच आपल्या भाषणातून उभे केले. या कार्यक्रमाला राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू यांच्यासह रतन टाटा, मुकेश अंबानी यांच्यासह जागतिक स्तरावरचे प्रमुख उद्योजक उपस्थित होते.

प्रधानमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील औद्योगिक प्रगती आणि संधींचा आढावा घेताना पंतप्रधानांच्या सबका साथ सबका विकास या संकल्पनेच्या पूर्तीसाठी महाराष्ट्र हा केंद्र सरकारचा ट्रस्टेड पार्टनर असल्याचा विश्‍वास दिला. 

इज ऑफ डुईंग बिझनेसची चर्चा जगभर सुरू असते, पण भारताचा त्यात पहिला क्रमांक असून गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक तीनशे टक्क्यांनी वाढली असल्याचे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आपण पूर्ण क्षमतेने प्रयत्नशील असून 2020 पर्यंत महाराष्ट्रात वन ट्रिलियन इकॉनॉमी बनवण्याचा ध्यास घेतला असल्याचे ते म्हणाले. 

अर्थव्यवस्थेचे स्वरूपच वेगाने बदलत असून आगामी पाच दहा वर्षातच मटेरियल इकॉनॉमीची जागा डिजिटल इकॉनॉमी घेईल असे भाकितही फडणवीस यांनी वर्तवले. महाराष्ट्रात शेतीक्षेत्रातील 24 लाख कुशल कामगारांना रोजगार देण्यासाठी राज्य सरकार पावले उचलत असल्याचे सांगताना सुमारे 300 फिनटेक स्टार्टअप्स सुरू करण्यासाठी धोरण तयार असल्याची माहिती त्यांनी दिली. अवकाश आणि संरक्षण क्षेत्र, इ- व्हेईकल धोरण, एकात्मिक औद्योगिक धोरण तयार इन्फ्रास्ट्रक्चर गुंतवणुकीत डॉइश बँकेने महाराष्ट्राला पहिला क्रमांक दिला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

राज्यातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारकडून उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या उद्योजकांना राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र - कन्व्हर्जन्स 2018 या परिषदेत उद्या, सोमवारी  हे पुरस्कार दिले जातील. माहिती तंत्रज्ञान, निर्यात यांसारख्या वेगवेगळ्या क्षेत्रातील 47 मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित केले जाईल.