Thu, Apr 25, 2019 11:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्पेलिंग मिस्टेकमुळे अडचणीत आलेल्यांना सेवेत घ्या : मुख्यमंत्री

स्पेलिंग मिस्टेकमुळे अडचणीत आलेल्यांना सेवेत घ्या : मुख्यमंत्री

Published On: Jun 20 2018 2:01AM | Last Updated: Jun 20 2018 1:52AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई महानगरपालिकेच्या 2,700 सफाई कामगारांपैकी नावातील इंग्रजी स्पेलिंग मिस्टेकमुळे सेवेत सामावून घेण्यास अडचणी आलेल्यांकडून क्षतिपूर्ती बंधपत्र (इंडेमिटी बाँड) घेऊन त्यांना येत्या तीन महिन्यात सेवेत सामावून घ्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांना सेवेत घेण्यासाठी येणार्‍या अडचणींसंदर्भात मंगळवारी मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कामगारांना सेवेत सामावून घेण्यात यावे. न्यायालयाच्या यादीतील नावे व सफाई कर्मचार्‍यांच्या पडताळणीत आढळलेल्या नावातील इंग्रजी स्पेलिंगमधील चुकांसंदर्भात संबंधित कर्मचार्‍यांकडून क्षतिपूर्ती बंधपत्र (इंडेमिटी बाँड) घेण्यात यावे. तसेच ज्या कामगारांना पूर्वी नियुक्‍ती देऊन स्पेलिंगमधील चुकांमुळे नियुक्‍ती आदेश रद्द करण्यात आले आहेत, अशा कामगारांना प्राधान्याने नियुक्‍ती द्यावी.