Tue, Nov 13, 2018 05:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत टीबी रुग्णांची संख्या वाढली : मुख्यमंत्री

मुंबईत टीबी रुग्णांची संख्या वाढली : मुख्यमंत्री

Published On: Jul 19 2018 2:05AM | Last Updated: Jul 19 2018 2:05AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईत टीबीच्या रुग्णांची संख्या वाढली असल्याची धक्कादायक माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.टीबीला देशातून हद्दपार करण्यासाठी केंद्र सरकारने 2025 हे लक्ष्य ठरवले आहे,  मात्र मुंबईची परिस्थिती पाहता टीबीच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. एप्रिल 2017 ते मार्च 2018 या कालावधीत मुंबईत 45,000 क्षयरुग्णांची नोंद झाली.

2017 साली एमडीआर टीबी रुग्ण हे 4891 होते तर त्यापुढील टप्पा म्हणजे एक्स.डी.आर टीबीचे 670 रूग्ण असल्याचे आढळून आले आहे. टीबी हा हवेमार्फत पसरत असल्याने, शहरातील वाढती लोकसंख्या, दाट वस्ती आणि घरातील खेळत्या हवेचा अभाव यामुळे टीबी रूग्णांच्या संख्येेत वाढ झाली असल्याची माहिती विधानसभेत लेखी उत्तरात  मुख्यमंत्र्यांनी दिली. राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत खाजगी रुग्णालयांतील 4891 टीबीच्या रूग्णांची नोंदणी करून त्यांच्यावर आधुनिक उपचार पद्धतींद्वारे उपचार सुरु असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.