Tue, Jul 23, 2019 04:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › व्यवसाय सुलभता; राज्य पिछाडीवर

व्यवसाय सुलभता; राज्य पिछाडीवर

Published On: Sep 10 2018 1:17AM | Last Updated: Sep 10 2018 1:03AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

इतर राज्यांच्या तुलनेत औद्योगिक क्षेत्रात मोठा समजला जाणारा महाराष्ट्र व्यवसायातील सुलभतेमध्ये (इज ऑफ डुईंग बिजनेस) पिछाडीवर आहे.  राज्याचा देशात किमान तिसरा क्रमांक येण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांना दिले आहेत.

औद्योगिक धोरण आणि संवर्धन (डीआयपी) तसेच जागतीक बँकेव्दारे सर्व राज्ये आणि केंद्र शासित राज्यांमध्ये क्रमवारी काढण्यात आली होती. डीआयपीपी ही व्यावसायिक क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी क्रमवारी करत असते. त्यामध्ये आंध्रप्रदेश प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्र उत्तर प्रदेश, तेलंगणा व झारखंडपेक्षाही पिछाडीवर गेले आहे. 

कामगार विभागातील एका अधिकार्‍याने सांगितले की, व्यवसायातील सुलभतेच्याबाबतीत महाराष्ट्राची अशी दयनीय अवस्था कधीही झाली नव्हती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यामध्ये आता लक्ष घातल्यामुळे सर्वच विभाग कार्यरत झाले आहेत. वर्षभरात राज्य वरच्या स्थानी येईल, असा दावाही या अधिकार्‍याने केला.