Mon, Aug 19, 2019 15:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुख्यमंत्री मुंबईच्या रणांगणात उतरले!

मुख्यमंत्री मुंबईच्या रणांगणात उतरले!

Published On: Apr 23 2019 1:45AM | Last Updated: Apr 23 2019 1:56AM
मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्रव्यापी झंझावाती प्रचारदौरा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईच्या प्रचारात उतरत असून, आज मंगळवार दि. 23 एप्रिल रोजी अशोकवन, दहिसर पूर्व येथे सायंकाळी 6.00 वाजता उत्तर मुंबईतील महायुतीचे लोकसभा उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या प्रचारार्थ त्यांची जाहीर सभा होत आहे. 

उत्तर मुंबईतील प्रचार शिगेला पोहोचला असून मुंबई उपनगरच्या सर्वांगीण विकासासाठी या दहिसर सभेत मुख्यमंत्री काय बोलतात, याकडे उपनगरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. या सभेला रिपाइं नेते रामदास आठवले, शिवसेना नेते व उद्योग मंत्री सुभाष देसाई, शालेय शिक्षणमंत्री व भाजपा नेते विनोद तावडे आणि भाजपा मुंबईचे अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असेल. या सभेसाठी भाजपचे आमदार अतुल भातखळकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार योगेश सागर, आमदार मनीषाताई चौधरी, आमदार भाई गिरकर, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार विलास पोतनीस, उत्तर मुंबईचे जिल्हाध्यक्ष विनोद शेलार तसेच भाजप, शिवसेना, आरपीआय, रासपचे मान्यवर उपस्थित राहतील. या सभेसाठी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीने केले आहे.