होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आताची सेना ही शिवविरोध सेना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आताची सेना ही शिवविरोध सेना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Published On: May 27 2018 1:31AM | Last Updated: May 27 2018 1:31AMखानिवडे : वार्ताहर

पूर्वीची शिवसेना बाळासाहेबांची होती. त्यांच्याकडे व्हिजन होते, त्यांची काही स्वप्ने होती. मात्र, आताची शिवसेना ही शिवविरोध सेना बनली आहे. प्रकल्प आला तर विरोध, निर्णय घेतला तर विरोध, काम केलं तर विरोध, याला विरोध त्याला विरोध... सध्याच्या शिवसेना नेतृत्त्वाचा असा एककलमी कार्यक्रम सुरू आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता केली. ते शनिवारी वसई पश्‍चिमेत माणिकपूर येथे झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या संवाद कार्यक्रमात बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंच्या टिकेचा चांगलाच समाचार घेतला. एका आदिवासी मुलाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाम फ ोडला असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले, नरेंद्र मोदींना घाम फोडणारा अजुन पैदा व्हायचा आहे. सर्व विरोधक कर्नाटकात एकाच मंचावर का आले, कारण मोदींनीच तुम्हाला घाम फोडला आहे, असा प्रतिहल्‍ला त्यांनी चढवला. वसईत एकीकडे गुंडागर्दी करणारे आणि दुसरीकडे खंडणीखोरी करणारे निर्माण झाले आहेत. आपण अशांच्या मागे मतदार म्हणून उभे राहू का ? असा सवाल त्यांनी केला. एकदा पोलीस बाजूला ठेवून या, मग बघा आम्ही काय करतो, या उद्धव यांच्या आव्हानाला उत्तर देताना, हैदराबादमध्ये ओवेसी देखील हेच म्हणाले होते, असा पलटवार मुख्यमंत्र्यांनी केला. 

वसईच्या 26 बस फेर्‍या निवडून आल्याबरोबर सुरू करू, असे सांगता मग त्या फे र्‍या बंद कोणी केल्या? असा सवालही फ डणवीस यांनी केला. भगवा विचार हा त्यागाचा असून खंडणी अथवा दादागिरीचा नाही. पराभव दिसतोय म्हणूनच शिवसेना खालच्या पातळीवर  उतरली आहे. वनगा कुटुंबियांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन घर फोडणार्‍यांनो हे लक्षात असू द्या की, वनगा कुटुंबीय आमचेच  आहेत. 

उद्या मातोश्रीची दारे बंद झाल्यावर श्रीनिवास आमच्याकडेच येणार असून त्याला आमची दारे केव्हाही  उघडी आहेत. वसईचा हरितपट्टा कायम राहण्याची मागणी योग्य असून 29 गावे आपण कुठे जायचे याचा निर्णय घेतील. वसईतील दादागिरीला कोणीही घाबरू नये, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

यावेळी व्यासपिठावर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, खासदार कपिल पाटील, श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित, आरपीआयचे ईश्वर धुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

माझ्या संभाषणाचा सेनेकडून विपर्यास

खानिवडे : वार्ताहर

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकर्त्यांशी साधलेल्या संवादाची वादग्रस्त संभाषणाची ध्वनीफित शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुखांनी पालघरच्या जाहीर सभेत सर्वांना ऐकवल्याने एकच खळबळ उडाली. यावर शिवसेनेला आपला पराभव दिसत असल्याने असल्याने आपल्या संभाषणाचा विपर्यास केला, असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस यांनी वसईत केला.

ते म्हणाले, माझ्या 14 मिनिटांच्या सलग संभाषणाच्या या ध्वनीफितीमधील आधीचा बराच भाग आणि शेवटची दोन वाक्ये कापून संवादाचा विपर्यास होईल, असा नेमका मधला भाग ऐकवण्यात आला आहे. निवडणुकीच्या ऐन तोंडावर मतदार आणि जनता यांची दिशाभूल करणार्‍या शिवसेनेवर कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

फडणवीस म्हणाले, साम, दाम, दंड, भेद असे म्हणून मी थांबलो नाही. निवडणुकीच्या राजकारणात चालणार्‍या या प्रकारांचा प्रतिकार करा असे मला सांगायचे होते. तुम्ही तसे करा, असे मी अजिबात म्हटलेलो नाही. तसेे म्हटले असते तरी साम, दाम, दंड भेद म्हणजे कटुनिती असा अर्थ होतो. 

कुटनितीचा प्रतिकार कुटनितीने करा असाच अर्थ निघाला असता. आपण सरकार पक्ष आहोत, सत्तेचा दुरुपयोग करणार नाही. कुणी आपल्या विरोधात तसा प्रचार करायचा प्रयत्न केला तर तोही खपवून घेणार नाही. ही दोन महत्त्वाची विधाने ध्वनीफितीमधून वगळण्यात आल्याचा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला.