Fri, Jan 18, 2019 02:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाईंदर पालिकेतून छत्रपतींची प्रतिमा गायब

भाईंदर पालिकेतून छत्रपतींची प्रतिमा गायब

Published On: Mar 23 2018 1:58AM | Last Updated: Mar 23 2018 1:15AMभाईंदर : खास प्रतिनिधी

महापालिकेतील दालनांमध्ये स्वतःच्या नेत्यांचे फोटो लावताना शिवाजी महाराजांची आठवण राहत नाही का ? असा संतप्त सवाल करत मीरा-भाईंदरमधील सकल मराठा समाजाने आज महापालिका मुख्यालय दणाणून सोडले. महापौर, आयुक्तांना महाराजांची प्रतिमा भेट दिल्या आणि आठ दिवसांत प्रतिमा न लावण्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. 

महापालिकेत महापौर डिम्पल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, आयुक्त बी. जी. पवार , स्थायी सभापती ध्रुवकिशोर पाटील, अन्य सभापती व प्रमुख अधिकारी आदींच्या दालनात छत्रपती शिवाजी महाराजांची फोटो लावण्यात आलेले नाहीत. मात्र महापौरांसह अन्य पदाधिकार्‍यांच्या दालनात त्यांच्या नेत्यांचे फोटो आहेत. यावर सकल मराठा समाजाच्या बैठकीत गांभीर्याने चर्चा झाली होती. गुरुवारी मराठा समाज बांधवांनी पालिका आयुक्त पवार यांच्या दालनात जाऊन महाराजांची फ्रेम भेट दिली.  आयुक्तांतर्फे सहाय्यक आयुक्त स्वाती देशपांडे यांनी ती स्वीकारली. महापौरांच्यावतीने सचिव वासुदेव शिरवळकर यांनी प्रतिमेचा स्वीकार केला. उपमहापौरांच्या दालनाबाहेरील पॅसेजमध्ये महाराजांची प्रतिमा लावण्यात आली . अन्य पदाधिकार्‍यांना आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. प्रोटोकॉलप्रमाणे दालनांमध्ये शिवाजी महाराजांचा फोटो लावण्यात आला नाही तर  आंदोलन छेडण्याचा इशारा सुभाष काशीद, मनोज राणे, जयराम मेसे, विनोद जगताप,  संदीप राणे, प्रकाश निकमआदींनी दिला.

Tags : Mumbai, Mumbai news, Chhatrapati image, disappeared, from Bhayandar palika,